बाल संगोपन योजनेबाबतची ‘‘ती’’ बातमी बोगस -समाज कल्याण अधिकारी दीपक घाटेकोल्हापूर, दि. 22 : बालसंगोपन योजनेअंतर्गत दरसाल 5 हजार 100 रूपये मिळतात. अशा आशयाची सोशल माध्यमांवर फिरणारी बातमी बोगस आहे. अशी कोणतीही योजना नाही. नागरिकांनी यास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
जे विद्यार्थी/विद्यार्थीनी इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेत आहेत. व ज्यांच्या आई, वडीलांपैकी कोणी एकजण मयत आहे. अशा विद्यार्थी/विद्यार्थीनींना "बाल संगोपन योजनेतंर्गत" जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग-1 यांच्या कार्यालयाकडून दरसाल 5 हजार 100 रुपये (कमी अधिक प्रमाणात) मिळतात. त्या साठी बालकाचे पासपोर्ट फोटो (4 प्रती), बालकाचा शाळेचा बोनाफाईड, बालकाचा रहिवाशी प्रमाणपत्र (नगरपरिषद/ ग्रामपंचायत/तहसिल/तलाठी), बालकाचा आधारकार्ड झेरॉक्स, पालकांचा मृत्यू प्रमाणपत्र झेरॉक्स, आई/वडील किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र (फिट), आई/वडील किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे बालकासोबत घरासमोरील मोठा फोटो, आई/वडील किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे रहिवाशी प्रमाणपत्र, बंदीपाल्य असल्यास जेलचे शिक्षा भोगत असलेले प्रमाणपत्र, आई/वडील किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे पासबुक झेरॉक्स या कागदपत्रासह विहीत नमुन्यातील अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर आहे. गरजू विद्यार्थी/विद्यार्थीनींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, अशा आशयाची बोगस बातमी समाज माध्यमांवरुन फिरत आहे. अशी कोणत्याही प्रकारची योजना नाही. नागरिकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी श्री. घाटे यांनी केले आहे.
000000

                     अम्हना सपोर्ट  करण्यासाटी Ads वर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area