पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 16 : विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शिवाजी विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअरचे दि. 19 ते 20 ऑक्टोबर असे दोन दिवस आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.माळी यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेची जिल्यादितील नामांकित आस्थापनांची विविध रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रमांक ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने विहित केलेल्याय अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट व्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
इच्छुक युवक-युवतींनी दि. 19 ते 20 ऑक्टोबर पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2690645 वर संपर्क साधावा.
000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area