कला संचालनालय प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

 


मुंबई, दि. ५ : कला संचालनालय, मुंबई अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२०– २१ प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कला संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

 

शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करिता कला संचालनालय, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील प्रथम वर्ष पदविका/प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम ( मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षक आर्ट मास्टर) प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.

 

उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकानुसार http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. इच्छुक उमेदवारांनी www.doa.org.in या संकेतस्थळावर दिलेले पात्रतेचे नियम, प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज भरावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

सुधारित प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आणि नियोजित तारखा खालीलप्रमाणे :

 

१. मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे यासाठी २० ऑक्टोबर २०२० पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

२. उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड याद्या प्रदर्शित करणे : २२ ऑक्टोबर २०२०

३. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास त्या सादर करणे : २३ ऑक्टोबर २०२०

४. उमेदवारांसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे : २६ ऑक्टोबर २०२०

५.संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा दिनांक (संबंधित महाविद्यालयांनी उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासून प्रवेश देण्यात यावेत) : २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area