दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

 


मुंबई, दि. १६ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत २१ दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत विविध वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता कर्णबधिर व ऐकायला येण्यास अवघड व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता  डॉ. संजय सोनावळे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

 

या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/CjGpCtUc-ak    या लिंकचा वापर करावा. तसेच यापुर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या यु टयूब चॅनल ला भेट द्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area