शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

 


मुंबई दि २१ : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.

आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी विविध पोलिस दलांमधील २६ पोलीस अधिकारी आणि २४० पोलीस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली व या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

अम्हना सपोर्ट  करण्यासाटी Ads वर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area