1 डिसेंबर जागतिक एड्स दिन जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 1 ते 31 डिसेंबर पर्यंत एच.आय.व्ही, एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन



कोल्हापूर, दि. 30 : 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येतो. या वर्षी Globle Solidarity Shared Responsibilty (जागतिक एकता व सामायिक जबाबदारी) ही संकल्पना असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून दि. 1 ते 31 डिसेंबर पर्यंत एच.आय.व्ही, एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नॅकोमार्फत दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत Globle Solidarity Shared Responsibilty (जागतिक एकता व सामायिक जबाबदारी) या विषयावर विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीयस्तरावर व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित केला आहे. शिक्षक, विद्यार्थी, अति जोखमीचे गट, स्थलांतरीत कामगारांच्या संघटना, आरोग्य कर्मचारी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, बचत गटातील महिला, पोलीस, साखर कारखान्यातील कारखानदार, महसूल विभागातील अधिकारी, जिल्हास्तरीय आरोग्य समितीचे सभासद, औद्योगिक कामगार व त्यांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
तज्ञांची व्याख्याने, शपथवाचन- महाविद्यालयातील ऑनलाईन एज्युकेशनच्या (रेकॉर्ड केलेल्या मुलाखती) माध्यमातून एचआयव्ही/एड्सविषयी मुलभूत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचार या विषयावर आयोजन करण्यात येणार आहे. एलईडी स्क्रीनद्वारे एचआयव्ही/एड्स विषय जनजागृती करण्यात येणार आहे. एच.आय.व्ही. प्रतिबंध तसेच कोरोना काळात प्रोत्साहनीय काम केलेल्या कर्मचऱ्यांचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
जागतिक एड्स दिन व मास औचित्याने, सोशल मीडियावर एक मिनिटाचा प्रचारात्मक व्हिडीओ स्पर्धा One Minute promotional Video.GIF/MIMS स्पर्धा, सेल्फी विथ स्लोगन स्पर्धांचे नियोजन करण्यात येणार आहे. एचआयव्ही/एड्स टेस्टिंग शिबीर/रक्तदान शिबीरे आयोजन करण्यात येणार आहेत. एचआयव्ही/एड्स विषय जनजागृतीपर सेल्फी स्टँड उभी करुन आणि पोस्टर प्रदर्शन भरवून एचआयव्ही/एड्सची जनजागृती करण्यात येणार आहे. स्थानिक टी.व्ही. चॅनेलवर व आकाशवाणीवर एचआयव्ही/एड्स तथा मातेकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही/एड्स संसर्गापासून विविध प्रतिबंध या विषयी तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक ठिकाणे, शाळा, वाचनालये, संस्था यांच्या फलकांवर जागतिक एड्स निर्मुलन दिन 2020 एड्स मुक्त कोल्हापूर…स्वप्न नव्हे, आमचे ध्येय आणि जबाबदारी हा संदेश लिहून त्यासोबत सेल्फी उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (लिंक वर्कर स्किम) व नेहरु केंद्राच्या समन्वयाने दि .1 ते 31 डिसेंबर या कालावधीत 20 निवडक गावांमध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area