दुचाकी वाहनांकरीता एम.एच.10-डी नवीन मालिका



सांगली, दि. 25 : दुचाकी वाहनांकरीता एम.एच.10-डी ही नवीन मालिका गुरूवार दि. 26 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होत असून या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी कळविले आहे.
पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहित केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, इमेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आहे. अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत निर्धारीत फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल, त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area