पदवीधर व शिक्षक निवडणूक -2020 बाबतचे प्रशिक्षण संपन्नबारामती दि. 24:- पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक -2020 साठी नियुक्त केलेल्या केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी पार पाडावयाची जबाबदारी या विषयाचे प्रशिक्षण आज नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथील बैठक सभागृह मध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी बारामती नगरपालिका मुख्याधिकारी किरणराज यादव, निवासी नायब तहसिलदार धंनजय जाधव, सर्व केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी कांबळे यांनी बारामती तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघ-2020 च्या निवडणूकी बाबत प्राथमिक माहिती दिली. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेली जबाबदारी अत्यंत पारदर्शक पार पाडावी, निवडणूक आचार संहितेचे पालन करावे, ही निवडणूक कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्राला मास्क, सॅनिटायझर, थर्मलस्कॅनर या वस्तुंचा पुरवठा करण्यात येईल त्यांचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवून मतदान प्रक्रीया पार पाडावी, प्रत्येक मतदाराचे वैद्यकीय अधिका-यांकडून थर्मल स्कॅन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर मतदान प्रक्रीयेचे कामकाज कसे पार पाडावे याबाबतचे प्रशिक्षण सादरीकरण करुन देण्यात आले. या सादरीकरणामध्ये मतदान कक्षाची रचना कशी असेल, मतदान कक्षाचा प्रोटोकॉल कसा पाळावा, मतपेटीचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे नमूने व फॉर्म्स कसे भरावेत, मतपत्रिका, विविध शिक्के, शाई, स्केच पेन यांचा योग्य ठिकाणी कसा वापर करावा, मतदारांनी कशा प्रकारे मतदान करणे आवश्यक आहे, मतदाराची कोणती ओळखपत्रे तपासण्यात यावीत, सॅनिटायझरमुळे बोटावरील खूण मिटणार नाही याची दक्षता कशा प्रकारे घेता येईल, संविधानिक, असंविधानिक व इतर लिफाफे यांचा उपयोग कसा करण्यात यावा याबाबत सूचना दिल्या. सर्व केंद्रप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्याची वाटप करण्यात येईल. मतदानाचे कोणतेही साहित्य पोलिस संरक्षणाशिवाय इतरत्र हलवता येणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी तसेच मतदानाच्या दिवशी सूक्ष्म निरीक्षक केंद्राला भेट देऊ शकतात. त्यांना संबंधिताने प्रेटोकॉलनुसार आवश्यक ती माहिती पुरविण्यात यावी व त्यांच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वात महत्वाची जबाबदारी ही मतदान केंद्रप्रमुखाची आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली मतदान प्रक्रीया पार पडेल. केंद्र प्रमुखांनी अचार संहितेचे आणि भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करुन मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्याचे कर्तव्य चोख बजावावे, असेही निर्देश कांबळे यांनी यावेळी दिले.
00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area