*पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणूक 2020* *निवडणूक निरीक्षक निलिमा केरकट्टा यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी*

 


कोल्हापूर, दि. 22 : शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पाहणी निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी आज केली. शांततेत व पादर्शक मतदान पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, अशी सूचना निवडणूक निरीक्षक श्रीमती केरकट्टा यांनी दिली.*
निवडणूक निरीक्षक श्रीमती केरकट्टा यांनी हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील कन्या विद्यामंदिर, न्यू मॉडेल इंग्लीश स्कूल,विद्यापीठ हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी
डॉ. विकास खरात, हातकणंगले तहसीलदार प्रदिप उबाळे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार शीतल मुळे- भामरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षक श्रीमती केरकट्टा यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुवरठा अधिकारी दत्तात्रेय कवितके, एम. आय. डी. सी चे क्षेत्रीय अधिकारी धनंजय इंगळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन तयारीचा आढावा दिला. श्री. देसाई म्हणाले, मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार असून, विना मास्क येणाऱ्या मतदारांनाही मास्क देण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा दिला.
श्रीमती केरकट्टा म्हणाल्या, मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. आदर्श आचार संहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या निवडणुका अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडाव्यात, त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा सूचना केली. मतदान तयारीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area