कोल्हापूर, दि. 24 : कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये हयातीबाबतचे दाखले कोषागारास सादर करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेत आहे त्या बँकामध्ये निवृत्तीवेतन हयातीचे दाखल्याबाबत यादी पाठविण्यात आली आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भाव विचारात घेता दि. 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी जीवन पोर्टल मार्फत, पूर्वीप्रमाणे बँकेमार्फत, प्रत्यक्ष कोषागारात जावून व पोस्टाद्वारे हयातीचा दाखला सादर करु शकता, असे जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे यांनी कळविले आहे.