लॉकडाऊमध्ये 31 डिसेंबर पर्यंत वाढ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेशकोल्हापूर, दि. 28 : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत दि. 31 डिसेंबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. यापूर्वीच्या आदेशात नमुद केलेली प्रतिबंधीत/बंद क्षेत्र व सुट/वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत.
यापूर्वी वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी/क्षेत्र पुर्ववत सुरु राहतील. यापूर्वी दिलेले आदेश दि. 31 डिसेंबर पर्यंत अस्तिवात राहतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area