आजअखेर 46 हजार 876 जणांना डिस्चार्ज



कोल्हापूर, दि. 28 : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 724 प्राप्त अहवालापैकी 723 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1 आहेत चाचणीचे 139 प्राप्त अहवालापैकी 139 निगेटिव्ह खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 175 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 166 तर 9 पॉझीटिव्ह, असे एकूण 10 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 2 पॉझीटिव्हपैकी 46 हजार 876 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 450 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 10 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा 1, गडहिंग्लज- 1 करवीर-1, राधानगरी -1 कोल्हापूर महापालिका क्षेत्र-5 व इतर शहरे व राज्य 1 असा समावेश आहे.
आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 859, भुदरगड- 1227, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1458, गगनबावडा- 145, हातकणंगले-5281, कागल-1662, करवीर-5617, पन्हाळा- 1850, राधानगरी-1235, शाहूवाडी-1348, शिरोळ- 2499, नगरपरिषद क्षेत्र-7416, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 895 असे एकूण 46 हजार 695 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 298 असे मिळून एकूण 49 हजार 2 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील 49 हजार 2 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 46 हजार 695 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 676 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 450 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area