पुणे विभागातील 5 लाख 4 हजार 316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 34 हजार 907 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ रावपुणे,दि.30 :- पुणे विभागातील 5 लाख 4 हजार 316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 34 हजार 907 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 609 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 42 हजार 370 रुग्णांपैकी 3 लाख 22 हजार 477 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 595 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.19 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 59 रुग्णांपैकी 48 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 966 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 690 रुग्णांपैकी 41 हजार 938 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 155 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 748 रुग्णांपैकी 44 हजार 593 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 459आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 40 रुग्णांपैकी 46 हजार 928 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 434 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 125 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 830 , सातारा जिल्ह्यात 135, सोलापूर जिल्ह्यात 118, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण -
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 930 समावेश आहे. पुणे जिल्हयामध्ये 622, सातारा जिल्हयामध्ये 88, सोलापूर जिल्हयामध्ये 172, सांगली जिल्हयामध्ये 31 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 17 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 55 हजार 725 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 34 हजार 907 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area