ताराराणी पक्षातर्फे स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
November 27, 2020
0
इचलकरंजी/प्रतिनिधी -
सहकार चळवळीचे प्रणेते, देशाचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
प्रारंभी यशवंत प्रोसेसचे चेअरमन अहमद मुजावर यांनी स्व. यशवंत चव्हाण यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेताना वस्त्रनगरी इचलकरंजीच्या विकासात त्यांचे असलेले योगदान व जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळता आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी अशोकराव सौंदत्तीकर, प्रकाशराव सातपुते, सुनिल पाटील, सर्जेराव पाटील, सुभाष जाधव, महेश सातपुते, आनंदराव नेमिष्टे, राजाराम बोंगार्डे, विठ्ठल सुर्वे बंडोपंत लाड, फुलचंद चौगुले, सुरेश कोल्हापुरे, महावीर कुंरुदवाडे, शंकर येसाटे, अरुण निंबाळकर, नरसिंह पारीक, सुनिल सुतके, शरद चव्हाण, रमेश पाटील, प्रविण केसरे, मनुभाई फरास, बाबासाहेब नलगे, राजू माळी, विजय पाटील, बंजरंग कुंभार, राजेंद्र दरिबे, किशोर पाटील, सौ. सुवर्णा लाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags