गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा



 मुंबईदि. 29 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

गुरु नानक देशातील एक महान दार्शनिक संत आणि द्रष्टे समाजसुधारक होते. गुरुनानक यांनी मनुष्यमात्रांची समानता व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला. त्यांची विश्वबंधुत्वाची शिकवण सर्वकालीन प्रासंगिक आहे. गुरु नानक जयंतीच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area