इचलकरंजीतील जुगार क्लबवर छापा इचलकरंजी/प्रतिनिधी -

येथील आवळे गल्ली परिसरातील घरात सुरु असलेल्या जुगार क्लबवर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने छापा टाकला. या कारवाइत घरमालकासह १४ जणाना अटक करण्यात आली आहे. तर  1लाख 39 हजार 480 रुपयांची रोकड,  
१२ मोबाईल, १ चारचाकी, 4 दुचाकी व जुगाराचे इतर साहित्य असा 12 लाख 95 हजार 980 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरचे पोहेका अर्जुन वसंतराव बंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे याच क्लबवर महिन्याभरापूर्वी छापा टाकण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

अटक करण्यात आलेल्यामध्ये घरमालक तानाजी विष्णू आवळे ( वय ४४ रा.आवळे गल्ली), अमर निवृत्ती मगदूम, (वय ४५ वेताळ पेठ), विजय वसंत पाटील, (वय ३१ रा. सांगली वाडी, ता.मिरज), जावेद महंमदसाब मुल्ला (वय २९ रा. कारंडे मळा शहापूर), संभाजी भुपाल जाधव (वय ५० रा.कोरोची), प्रमोद कांताप्पा सिंहासने (वय ३७ रा. वेताळपेठ),  सोनू उर्फ प्रसन्न पांडूरंग कुलकर्णी  (वय ३४  रा. सांगलीवाडी), जावेद नसरुद्दीन दानवाडे (वय ४० रा.सावित्रीनगर शहापूर), सतिश मारूती मोरे, (वय ४९ रा. जैन गल्ली मिरज), सलीम इलाई मुजावर (वय ५४ रा.कुपवाड जि.सांगली), मनोहर कृष्णाजी पोवार (वय ३१ रा. दक्षिण शिवाजीनगर, जि.सांगली),  स्वप्नील तानाजी काळे (वय ३० रा.नारायण नगर, इचलकरंजी), रविंद्र युवराज तडाखे ( वय ४८ लालनगर) व सुनिल दगडू कुंभार (वय ३३ रा.नविन कोल्हापूर नाका, आंबेडकर नगर) यांचा समावेश आहे.
आवळे गल्ली येथील तानाजी आवळे यांच्या घराचे तळमजल्यातील खोलीमध्ये पत्याचे भारी पानावर चढाओढीने पैसे  लावून तीनपानी  जुगार सुरु असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री ११.१५ च्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तानाजी आवळे, रवींद्र तडाखे व  सुनिल कुंभार वगळता ११ जण जुगार खेळताना सापडले.आवळे हा घरमालक तर तडाखे व  कुंभार हे दोघे कामगार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area