वीज बिल माफीसाठी इचळकरंजीत मोर्चाइचलकरंजी/प्रतिनिधी -
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी मंगळवारी सर्वपक्षीय कृती समिती, विविध यंत्रमागधारक संघटना व वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत वीज बील माफ केले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असून टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी करत विविध पक्ष संघटनांच्यावतीने आंदोलने छेडण्यात येत आहेत. त्यातून राज्य सरकारकडून दिलासा मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. परंतु ऊर्जामंत्री यांच्या वक्तव्याने वीज बील माफीच्या घोषणेला बगल दिल्याने शासनाकडून झालेल्या फसवणूकीच्या निषेधार्थ खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वीज बील माफीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आल होते. येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गावरुन मोर्चा राज्य शासनाच्या विरोधात जोरदारी घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयासमोर आला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी, वीज बिल माफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांचा विस्तृत आढावा  सादर करत जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, सरकार वीज बिल माफ करणार नाही असे म्हणत असेल तर आम्हीही वीज बिल माफ करुन घेतल्याशिवाय सोडणार नाही. त्यासाठी संघटीतपणे रस्त्यावरच्या लढाईची तीव्रता वाढवूया. कोणीही वीज बिल भरायचेच नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी असलेली ही चळवळ राजकारण विरहीत करून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी,  केंद्र सरकारने कोरोना कालावधीत काही अंशी दिलासा दिला. तर आता राज्य शासनाने वीज बिल माफ करणे गरजेचं आहे. राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असून त्यापैकी वीज बिल माफीला कोणाचा विरोध आहे ते समजू दे. बिल भरा अन्यथा कनेक्शन तोडू ही भाषा आम्हाला चालत नाही. आणि तसा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. या प्रश्‍नी सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा इशाराही  दिला. त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी प्रकाश दत्तवाडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, रवि रजपुते, अनिल मादनाईक, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, जयकुमार कोले, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंखे, संजय केंगार आदींचा समावेश होता.
इचलकरंजी/प्रतिनिधी - 
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भिती व्यक्त होत असून प्रत्येक व्यक्ती जगली पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. अशावेळी आंदोलन करण्यापेक्षा कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आंदोलनासाठी एकत्र जमून  गर्दी करुन त्यातून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. राजकारणावेळी राजकारण जरूर करूया. परंतु आता कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता रहावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. राज्य सरकार संवेदनशील असून आचारसंहिता संपताच वीज बिल माफी संदर्भात सर्वांनाच गोड बातमी मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
इचलकरंजीत वीज बिल माफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार माने यांनी पत्रकार परिषदेत आपली व राज्य शासनाची भूमिका मांडली. ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून पुन्हा लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे. राज्य सरकार संवेदनशील असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसली. शासनानेही गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकर्‍यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. राज्य सरकारला निर्णय घेण्यास विलंब होत असला तरी ते जनतेच्याच हिताचा निर्णय घेणार आहे. आंदोलनासाठी एकत्र येऊन गर्दी केल्याने त्यातून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारला केंद्राकडून 38 हजार कोटी रुपयांचा परतावा अद्याप मिळालेला नाही. ती रक्कम मिळाल्यास अन्य योजनांसाठी वापरता येईल. परंतु या संदर्भात विरोधक काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मदन कारंडे, सयाजी चव्हाण, महादेव गौड, रविंद्र माने, रवि लोहार, भाऊसो आवळे, महेश बोहरा, महेश ठोके उपस्थित होते.


इचलकरंजी/प्रतिनिधी -
मराठा समाजाचे आरक्षणासह अन्य न्याय हक्कांसाठी वेगवेगळे लढण्याऐवजी सर्वांनी एकजुटीने ताकदीने हक्क मिळविण्यासाठी कार्यरत झालो आहोत. खासार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र आलो आहोत. कर्म मराठा, धर्म मराठा हे ब्रिदवाक्य घेऊन मराठा जोडो अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते पुंडलिक जाधव व शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी दिली.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मराठा संघटनांना एकत्र करुन इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी केली आहे. त्याची कार्यकारीणी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
सकल मराठा समाज इचलकरंजी शहर अध्यक्षपदी पै. अमृत भोसले, कार्याध्यक्षपदी मोहन मालवणकर तर उपाध्यक्षपदी अमरजित जाधव, अरविंद माने, खजिनदारपदी भारत बोंगार्डे, सचिवपदी शशिकांत मोहिते, सहसचिवपदी वैभव खोंद्रे यांची आणि सदस्यपदी रणजित जाधव, किसन शिंदे, राजवर्धन नाईक, नितीन कोकणे, नितीन पाटील, मनोज साळुंखे, शहाजी भोसले, संतोष सावंत, प्रमोद खुडे, विठ्ठल येसाटे, प्रसाद जाधव, नागेश पाटील, गणेश जाधव, उदय निंबाळकर, किशोर निंबाळकर, अजित शिंदे, अभिजित रवंदे, दिलीप पाटील शिवाजी पाटील व सागर कचरे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रवक्तापदी पुंडलिक जाधव, पै. अमृता भोसले, मोहन मालवणकर आणि दीपक रावळ यांची तर सिव्हिक बोर्डात आबा जावळे, पुंडलिक जाधव, उदय लोखंडे, आनंदराव नेमिष्टे, बंडोपंत लाड, प्रकाश मोरे, प्रकाश मोरबाळे, सुनिल शेलार, संजय जाधव, सचिन हळदकर, राजाराम बोंगार्डे व रविंद्र माने यांची निवड करण्यात आली आहे.
मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह समाजासाठी विकासात्मक कामे करणे, समाजातील नवयुवकांसाठी शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात काम करणे, सर्वच विभागाचे परिक्षण करुन विभागनिहाय कमिट्या तयार करणे, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सामावून घेऊन कार्यरत राहणे या उदात्त हेतुने शहर व परिसरातील सर्व मराठा समाजबांधवांना व संघटनांना एकत्र केले आहे. आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासह सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्यासाठी ही कार्यकारीणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहर कार्यकारीणी, सिव्हिक बोर्ड आणि प्रवक्ते यांची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठा जोडो अभियान राबवत भागाभागात बैठका घेऊन जनजागृती केली जाणार आहे.
याप्रसंगी प्रा. युवराज मोहिते, किसन शिंदे, राजाराम बोंगार्डे आदींसह मराठा समाजातील युवक, ज्ये
ष्ठ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area