येवती सार्वजनिक तलावातील गाळ शिवराज नाळे स्वखर्चातून काढल्याने ग्रामस्थांनी मानले विशेष आभार

 


संघर्षनायक मीडिया न्यूजयेवती गावचे सूपुत्र, Ecmoa Maharashtra अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर ॲन्ड मशिनरी ओनर्स असोसिएशनचे संस्थापक सचिव माननीय श्री. शिवराज सदाशिव नाळे यांनी गेले चार दिवसांपासून सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने ग्रामपंचायत येवती येथील तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. मागील चाळीस वर्षांपासून गाळ न काढल्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाली होती.

पाणी म्हणजे जीवन…. पाण्याला जीवन मानून एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, भविष्यात हेच पाणी गावची शेती आणि जनावरांची तहान भागवेल अशी आशा करत संपूर्ण गाळ निघेपर्यंत काम चालू ठेवण्याचा निश्चय केला आहे…

दरवर्षी गावातील मुले भारत मातेच्या सेवेसाठी सैनिक भरती होत असतात पण त्यांना सरावासाठी मैदान असून नसल्यासारखे, मैदानावर प्रचंड प्रमाणात दगड पडले होते हे जेव्हा शिवराज यांच्या लक्षात आले त्याचवेळी श्री छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडांगणावर साफसफाई सुरू करून क्रीडांगणाचे क्षेत्रफळही वाढवून घेतले.
शिवराज यांचे असणारे जनसेवेचे निस्वार्थ वेड सर्वज्ञात आहे, त्याबद्दल वेगळे सांगायची गरज ती काय? अश्या निस्वार्थी कर्तृत्वाचे आभार…….

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area