वारसा हक्काने मिळणार्‍या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गांत समाविष्ट सर्वच पदांना मिळणे गरजेचे – आमदार प्रकाश आवाडे

 


इचलकरंजी/प्रतिनिधी –

वारसा हक्काने मिळणार्‍या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गांत समाविष्ट सर्वच पदांना मिळणे गरजेचे आणि न्याय आहे. या संदर्भात सामाजिक न्याय विभाग आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे पंधरा दिवसात बैठक घेऊन हा प्रश्‍न निश्‍चितपणे सोडवू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त अथवा सेवेत असताना निधन झालेल्या अनुसुचित जातीतील कर्मचार्‍यांच्या वारसांना वारसा हक्क योजनेचा लाभ मिळावा, त्याचबरोबर हा निर्णय सर्व विभागातील सफाई कामगारांच्या वारसांना लागू असावा या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, नौशाद जावळे, रंगा लाखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते.
आमदार आवाडे म्हणाले, नगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचार्‍यांना वारसा हक्क मिळत होता. पण काही तांत्रिक कारणाने सध्या त्याचा लाभ दिला जात नाही. निवृत्त, सेवानिवृत्त अथवा सेवेत असताना मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना नोकरी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हा हक्क त्यांना मिळावा यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन यातील गांभिर्य लक्षात आणून देऊन शासनाला निर्णय बदलण्यास लावू. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात संबंधित मंत्रीमहोदयांकडे बैठक घेऊन असे सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, नौशाद जावळे, रंगा लाखे यांनी, चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या समस्या सोडवणूकीसाठी राज्य शासनाने लाड समितीची नियुक्ती केली. समितीने केलेल्या शिफारशीबाबत तांत्रिक समस्या निर्माण झालेने हा प्रश्‍न उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर गेला. खंडपीठाने याबाबत काही स्पष्टतेच्या सुचनादिल्यानुसार सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाने काही सुधारित निर्णय घेतले. त्यानुसार वाल्मिकी म्हेतर समाजाला सामाजिक, आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबत लाड समितीने शिफारस केलेली वारसा पध्दत पुढे चालू ठेवावी, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, सेवेत असताना निधन झालेल्या अनुसुचित जातीतील वारसांना या योजनेचा लाभ देणेत यावा तसेच हा निर्णय सर्व विभागातील सफाई कामगारांच्या वारसांना रहावा असेही निर्देश दिले. परंतु, हा प्रश्‍न काही विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित स्वरुपात हाताळला जात असल्याचे दिसून येते. वास्तविक चतुर्थ श्रेणीतील संवर्गातील सर्व पदांना हा लाभ मिळणे आवश्यक आहे. सध्या नगरपरिषदेकडे कर्मचार्‍यांचा वारसांची प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये एन्टी, मुस्लिम, लिंगायत, कोल्हाटी, कोरवी, वडार, कारवान इ. यांचा समोवशआहे. वास्तविक या कर्मचार्‍यांनाही याचा लाभ मिळणे आवश्यक आहे मात्र तो मिळत नाही. त्यामुळे  या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी खास बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी केली.
यावेळी शांतराम लाखे, नरेश नगरकर, विठ्ठल जावळे, शामराव जावळे, अशोक लाखे, पांडुरंग लाखे, अरुण लाखे, बशीर मोमीन, विलास जावळे, मुनीर जमादार, धोंडीराम जावळे, अंकुश जावळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area