इचलकरंजीत ऊसची ट्रॉली उलटली  इचलकरंजी, दि. ३० :  इचलकरंजी ऊस वहातुक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने झालेल्या अपघातात जयश्री प्रकाश माळी वय 35 व कमल सिद्धप्पा दुधाळे या दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाल्या सांगली नाका परिसरात ही घटना रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अपघातामुळे इचलकरंजी सांगली रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती

 ऊस वहातुक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने झालेल्या अपघातात या दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाल्या सांगली नाका परिसरात ही घटना रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अपघातामुळे इचलकरंजी सांगली रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती
 नांदणी येथून ऊस घेऊन  ट्रॅक्टर ट्रॉली (क्र mh 09 cj 6467) इचलकरंजी मार्गे  साखर कारखान्याकडे निघाली होती ट्रॅक्टर ट्रॉली इचलकरंजीत सांगली नाका परिसरात आली असता येथे चढण व  वळण  असल्याने वाहनावरील वाहनचालकाचा ताबा सुटला  ट्रॅक्टरची ऊस भरलेली ट्रॉली पलटी झाली या अपघातात शिरोळ येथून बंदोबस्तानंतर मोपेड वरून  परतलेल्या जयश्री माळी व कमल दुधाळे या दोन महिला कॉन्स्टेबल ट्रॉली खाली सापडल्या यात त्या दोघीही जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी शहर वाहतूक व गावभगचे सपोनि गजेंद्र लोहार यांच्या पथकाने धाव घेतली वाहतूक सुरळीत केली घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी भेट दिली ट्रॅक्टर चालक सुनील बोरगावे याला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area