इचलकरंजी, दि. 29 : येथील सुगंधी तंबाखुच्या गोदामावर कोल्हापूर आणि इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज छापा टाकला. सांगली रोड, बालाजी कॉलनीतील गोदामावर केलेल्या या कारवाईत 8 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.
येथील बालाजी कॉलनीत सुगंधी तंबाखु विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समजली. त्यानुसार कोल्हापूर आणि इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी सुगंधी तंबाखु आणि त्यासाठीचे केमिकल असा 8 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सदाशिव वाळवेकर, संतोष भीलुगडे, सुदाम टकले आणि सुरज मुदगल अशा चौघांना अटक केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, विजय कारंडे, किरण गावडे, तुकाराम राजगिरे, बबलू शिंदे, यशवंत कुंभार सहभागी झाले होते.