डीकेटीई संस्थेला सहा महिन्याच्या व्यावसायिक सर्टिफिकेट अभ्यासक्रमांना मान्यताइचलकरंजी/प्रतिनिधी –

युनिव्हर्सिटी ग्रॅन्टस कमिशन (युजीसी) व नॅशनल स्कील क्वालिफीकेशन फे्रमवर्क (एनएसक्युएफ) यांचेकडून डीकेटीई संस्थेला सहा महिन्याच्या व्यावसायिक सर्टिफिकेट अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी या अभ्यासक्रमांचा शुभारंभ होत आहे.
युजीसीने डीकेटीईमध्ये कॉम्प्युटर विभागात ‘कम्प्युटर नेटवर्कींग’, मेकॅनिकल विभागात ‘फौंड्री टेक्नॉलॉजी’, व सिव्हील विभागात ‘व्हर्च्युअल डिझाईन अ‍ॅन्ड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डींग्ज युजींग अ‍ॅटोकॅड अ‍ॅन्ड रेवीट’ अशा तीन व्यावसायिक सर्टिफिकेट अभ्यासक्रमांना मान्यता दिलेली आहे. कुठल्याही शाखेचा 12 वी पास विद्यार्थी बीएससी/डिप्लोमा/इंजिनिअरींग, तृतीय व अंतिम वर्षातील इंजिनिअरींगचे विद्यार्थी, इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी या कोर्सेसना प्रवेश घेवू शकतात. हे कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होतील. तसेच स्वयंरोजगार सुरु करुन विद्यार्थी त्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करु शकतील.  
‘कॉम्प्युटर नेटवर्कींग’ या कोर्समध्ये कॉम्प्युटर नेटवर्कशी संबंधित राउटर कॉन्फीगरेशन, बेसीक कम्पोनंटस ऑफ नेटवर्कींग, इंटरनेट अ‍ॅन्ड वायफाय कनेक्टीव्हीटी, ऑप्टीकल फायबर कनेक्टीव्हीटी, नेटवर्क डिव्हाईस सेक्युरिटी इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे. तसेच ‘फौंड्री टेक्नॉलॉजी’ या कोर्समध्ये इंडस्ट्रीअल सेफ्टी अँड मॅनेजमेंट, कास्टींग प्रोसेस अँड मटेरियल्स, मेल्टींग टेक्नॉलॉजी, मोल्डींग टेक्नॉलॉजी, फेटलिंग अँड इन्स्पेक्शन ऑफ कास्टींग, डिझाईन मेजरमेंट आणि मेट्रॉलॉजी प्रोजेक्ट/इनप्लँट ट्रेनिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे. ‘व्हर्च्युअल डिझाईन अ‍ॅन्ड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डींग्ज युजींग अ‍ॅटोकॅड अ‍ॅन्ड रेवीट’ या कोर्समध्ये अ‍ॅटोकॅड सॉफ्टवेअर, रेवीट आर्किटेक्चर सॉफ्टवेअर, रेवीट एमईपी इशेंशीयल इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे. या व्होकेशनल सर्टिफिकेट अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी डीकेटीईच्या अ‍ॅडमिशन सेलशी संपर्क साधावा असे आवाहन डीकेटीई इन्स्टिट्युटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area