भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातर्फे वीज बिलाची होळी इचलकरंजी/प्रतिनिधी –

राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीचे घोषणा करणारे उर्जामंत्री नितीन राऊत आता घुमजाव करत आहे. या सरकारला वीजमाफ करायच नाही, फक्त पोकळ घोषणा करून महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची फसवणूक करायची आहे. आणि म्हणूनच वचनभंग करणार्‍या ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लॉकडाऊन काळातील 100 युनिट पर्यंत वीजबिल माफ करावे यासाठी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातर्फे वीज बिलाची होळी करण्यात आली.
भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, धोंडीराम जावळे यांनी हे सरकार मागील दारातून सत्तेसाठी आलेले सरकार आहे. या सरकारला जनतेशी काहीही देणे घेणे नाही व हे सरकार कोरोना काळात घरात बसून सरकार चालवत आहे. या आघाडी सरकारने वीजबिल माफ करतो, शेतकर्‍यांना अनुदान देतो, सामन्य जनतेला विशेष पॅकेज देतो अशी खोटी आश्‍वासने दिली याबद्दल संताप व्यक्त केला.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अरुण कुंभार, सुनिल महाजन, किसन शिंदे, विनोद काकांणी, अमर कांबळे, अरविंद शर्मा, राजेंद्र पाटील, पांडुरंग म्हातुकडे, दिपक राशीनकर, पांडुरंग धोंडपुडे, अश्‍विनी कुबडगे, नागुबाई लेंढे, प्रमोद बचाटे, अरविंद चौगुले, अमित जावळे, चंद्रकात सुतार, शुभम बरगे, अर्जुन सुतार, सचिन माळी, इश्‍वर कांबळे, महादेव बडवे, शिवानंद रावळ, शंकर शिंत्रे, कुणाल बडवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area