TARARANI PAKSH KARYALAY इचलकरंजी दि. 20 नोव्हेंबर 2020 - येथील ताराराणी पक्ष कार्यालयात सहकार महर्षि, माजी खासदार कै. दत्ताजीराव कदमआण्णा यांची पुण्यतिथी आणि देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते कै. दत्ताजीराव कदम यांच्या आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्व. इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी कै. कदमआण्णा आणि स्व. इंदिराजी गांधी यांच्याबद्दल माहिती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर अहमद मुजावर यांनी दत्ताजीराव कदम आणि इंदिराजी गांधी यांच्या कार्याची विस्तृत माहिती विषद केली.
याप्रसंगी अशोक सौंदत्तीकर, प्रकाशराव सातपुते, स्वप्निल आवाडे, बाळासाहेब कलागते, विलास गाताडे, एम. के. कांबळे, आनंदराव नेमिष्टे, महावीर कुरुंदवाडे, बंडोपंत लाड, श्रीशैल बिळ्ळुर, सर्जेराव पाटील, सुभाष जाधव, शेखर शहा, सुरेश कोल्हापूरे, चंदकांत घाटगे, विठ्ठल सुर्वे, चंदकांत हुल्ले, गजानन लोंढे, राजू दरिबे, बजरंग कुंभार, अनिल शिकलगार, रंगा लाखे रमेश पाटील, विजय पाटील, विनायक शिंगारे, विजय पवार, चंद्रकांत कांबळे, फरीद मुजावर यांच्यासह आवाडे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area