राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 120 प्रकरणे निकालीइचलकरंजी/प्रतिनिधी -
हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायालय 1 यांच्यावतीने आयोजित  राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी 120 प्रकरणे निकालात काढत 3.78 कोटीची वसुली करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर हे होते.
या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व 1143 व न्यायालयातील प्रलंबित असलेली 349 प्रकरणे अशी एकूण 1492 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील दाखलपूर्व प्रकरणापैकी 33 व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 87 प्रकरणे अशी एकूण 120 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून 3 कोटी 78 लाख 20 हजार 570 इतकी वसुली करण्यात आली.
या लोकअदालतीसाठी एकूण 5 पॅनल ठेवण्यात आले होते. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. कोकरे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर पी. एस. भंडारी यांच्या विशेष प्रयत्नातून एका दिवसात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करता आली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरही लोक न्यायालयामध्ये अनेक संस्था, बँका, पतसंस्थांचे कर्मचारी, अधिकारी व पक्षकार यांनी सहभाग घेतला. लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, सरकारी वकील, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area