2082 कोटी पीक कर्ज वाटून कोल्हापूर राज्यात प्रथम नाबार्डचा 11107.64 कोटी रूपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा

 


2082 कोटी पीक कर्ज वाटून कोल्हापूर राज्यात प्रथम

नाबार्डचा 11107.64 कोटी रूपयांचा संभाव्य वित्त पुरव

नाबार्डचा 11107.64 कोटी रूपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा

 

कोल्हापूर, दि. 23: जिल्ह्याकरिता 2 हजार 480 कोटींचे वार्षिक उद्दिष्ट देण्यात आले होते. 30 नोव्हेंबर अखेर 2 हजार 82 कोटी इतकी उद्दिष्टपूर्ती करून कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर राहीला आहे. तसेच सन 2021-22 करिता जिल्ह्याचा 11107.64 कोटी रूपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा नाबार्डच्यावतीने सादर करण्यात आला.

          छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक आज झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई,  मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे आदी उपस्थित होते.

दुर्बल घटकांबाबत बँकांनी सकारात्मक रहावे - दौलत देसाई

          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी वार्षिक कर्ज योजना व सर्व महामंडळांचे उद्दिष्ट, मंजूरी तसेच प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला. ते म्हणाले, समाजातील दुर्बल घटकांबाबत बँकांनी नेहमीच सकारात्मक आणि सहानुभूतीचे धोरण ठेवावे. महामंडळांनी दिलेले उद्दिष्ट मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच बँकांच्या कर्ज वसुलीमध्येही सहकार्य करावे. शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. त्यामध्ये अधिकाधिक बचत गटांना सामावून घ्यावे, असे आवाहन करून पीक कर्ज वाटपात राज्यात जिल्ह्याला प्रथम स्थानात ठेवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

          जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. माने यांनी स्वागत करून सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले, 30 सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 11 लाख 19 हजार 409 खाती उघडण्यात आली आहेत. 8 लाख 1 हजार 724 खात्यामध्ये रूपेकार्ड प्रदान करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेंतर्गत 4 लाख 89 हजार 95 खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत 1 लाख 89 हजार 668 खाती उघडण्यात आली आहेत. अटल विमा योजनेंतर्गत 60 हजार 224 खाती उघडण्यात आली आहेत. सप्टेंबरअखेर प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत 15 हजार 700 लोकांना 228.93 कोटींचे अर्थसहाय्य पुरवण्यात आले आहे.

·        प्राथमिकता प्राप्त सेवाकरिता  9 हजार 320 कोटीचा आराखडा

·        30 सप्टेंबरअखेर एकूण उद्दिष्टांपैकी 5 हजार 201 कोटी (56 टक्के) पूर्तता

·        30 सप्टेंबरअखेर 30 हजार 414 कोटी ठेवी

·        जिल्ह्यात 23 हजार 723 कोटी कर्जाची शिल्लक

·        आत्मनिर्भर भारत नुसार पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना 4 हजार 795 खात्यांमध्ये 4.80 कोटी वाटप

 

 

नाबार्डचा 11107.64 कोटींचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. नाईक यांनी आराखडा सादर केला.

·        शेती/ शेतीपूरक क्षेत्रासाठी 5068.75 कोटी

·        सूक्ष्म/ लघू /मध्यम उद्योगांसाठी 4522.07 कोटी, इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 1516.81

      कोटी प्रस्तावित

·        शेती/शेतीपूरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पीक कर्जासाठी 3018.72 कोटी

·        सिंचनासाठी 578.75 कोटी

·        शेती यांत्रिकीकरणासाठी 424.82 कोटी

·        पशू पालन (दुग्ध) 544.73 कोटी

·        कुक्कुट पालन 38.83 कोटी

·        शेळी मेंढी पालन 57.87 कोटी

·        गोदामे/ शीतगृहांसाठी 90.36 कोटी

·        भूविकास/ जमीन सुधारणा 58.46 कोटी

·        शेती माल प्रक्रिया उद्योगांसाठी 179.73 कोटी प्रस्तावित

·        इतर प्राथमिक क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने गृहकर्ज 883.20 कोटी

·         शैक्षणिक कर्ज 266.10 कोटी

·        महिला बचत गटांसाठी 150.08 कोटी विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित

000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area