शेडमध्ये दारु विक्री करण्यासह दारुचा गुत्ता सुरु ठेवल्याप्रकरणी 34 जणांना अटक ; 2 लाख 70 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी/प्रतिनिधी -

पदवीधर व शिक्षक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ड्राय डे असतानाही शेडमध्ये दारु विक्री करण्यासह दारुचा गुत्ता सुरु ठेवल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी विक्रमनगर परिसरातील माच्छरे गल्लीत छापा टाकला या कारवाईत तब्बल 34 जणांना अटक करण्यात आली. तर विविध कंपन्यांची देशी दारू, मोबाईल, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा 2 लाख 70 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये काळूसिंग डोया माछरे (वय 68 रा. विक्रमनगर), राजेंद्र आप्पासो चव्हाण (वय 55 रा. नेहरुनगर), योगेश मारुती पाटोळे (वय 37 रा. विक्रमनगर), शाहानूर अलमशहा इनामदार (वय 48 रा. कृष्णानगर), मिलिंद सुरेश पाटील (वय 38 रा. शहापूर पाटील मळा), चंद्रकांत बाबूराव कोरे (वय 46 रा. कृष्णानगर), विशाल बाबूराव सागर (वय 25 रा. कारदगा ता. चिक्कोडी), नबी अमीन शेख (वय 48 रा. आरगेमळा), नारायण गुंडाप्पा गोटूर (वय 48 रा. कृष्णानगर), नितीन आनंदा गाडेकर (वय 35 रा. बेघरवसाहत कागल), संतोष आलाप्पा कोपद (वय 44 रा. विक्रमनगर), शिवाजी बाबू जगदाळे (वय 52 रा. आरगेमळा), विजय ज्ञानदेव सुगते (वय 51 रा. म्हसोबा गल्ली), रजनीश कृष्णा कदम (वय 36 रा. गणेशनगर), अशोक बापू वडर (वय 40 रा. जयभिमनगर), मकेश महालिंग हलाले (वय 42 रा. कारंडेमळा), नजीर हुसेन तांबोळे (वय 54 रा. कृष्णानगर), अविनाश गजानन पोवार (वय 30 रा. कृष्णानगर), श्रीकुमार गुंड्डाप्पा गोटूर (वय 40 रा. कृष्णानगर), अशोक रामचंद्र तिळवणे (वय 58 रा. कृष्णानगर), हणमंत अकूंश चंदनशिवे (वय 29 रा. जयभिमनगर), पांडुरंग राजाराम टोणपे (वय 44 रा. दत्तनगर), जोतिराम जगन्नाथ बावणे (वय 32 रा. विक्रममनगर), राजेश रामचंद्र खण्णूकर (वय 50 रा. विठ्ठलनगर), मारुती बाळू पाटोळे (वय 50 रा. विक्रमनगर), अनिल रामचंद्र लोढे (वय 45 रा. आरगेमळा), सागर जॉन जाधव (वय 28 रा. कारदगा ता.चिक्कोडी), 28 दस्तगीर मेहबूब मुल्ला (वय 45 रा. कृष्णानगर), सचिन मुरलीधर मुळे (वय 42 रा. जवाहरनगर), कुमार प्रकाश पांडव (वय 40 रा. हनुमाननगर), नागेश कोंडीबा थिट्टे (वय 30 रा. शहापूर), सौ. लाखनबाई काळूसिंग माच्छरे (वय 60), सौ. निर्मला मानिंग गागडे (वय 48) आणि माणिक परशुराम गागडे वय 50) यांचा समावेश आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीमुळे ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. असे असतानाही विक्रमनगर परिसरातील गायकवाड पेट्रोल पंपासमोर काळूसिंग माच्छरे यांच्या घरालगतच असलेल्या शेडमध्ये दारुची विक्री आणि दारु गुत्ता सुरु असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला असता घरालगत असलेल्या शेडमध्ये अनेकजण मद्यप्राशन करत असताना मिळून आले. कारवाई दरम्यान लाखनबाई माच्छरे, निर्मला गागडे व माणिक गागडे यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कोमल कन्हैयालाल पटेल यांनी फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area