इचलकरंजी/प्रतिनिधी -
येथील मुक्तसैनिक सोसायटीतील महादेव किराणा स्टोअसर्च सिमेंट पत्र्याचे छत फोडून चोरट्यांनी 40 हजाराच्या रोकडसह 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची वर्दी भिकाराम टीकाराम चौधरी (वय 47) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे.मुक्तसैनिक सोसायटीत भिकाराम चौधरी यांचे महादेव किराणा स्टोअर्स आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले होते. आज सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता चोरीची घटना उघडकीस आली. दुकानातील सिमेंट पत्र्याचे छत्र फुटल्याचे दिसले. चोरट्यांनी दगडाच्या सहाय्याने पत्रे फोडून आत प्रवेश केला. ड्रॉवरमध्ये ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड, 2 हजार रुपयांचे चॉकलेटस् व 5 किलो तूप असा 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.