जिल्ह्यात 58 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझेटिव्ह दोघांचा मृत्यु

 


यवतमाळ, दि. 4 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 58 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गत 24 तासात जिल्ह्यात 29जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यात यवतमाळ तालुक्यातील लहान बालक तर घाटंजी तालुक्यातील 89 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 507 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 478 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 387 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11660 झाली आहे. 24 तासात 58 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10897 आहे. तर जिल्ह्यात एकूण 376 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 113405 नमुने पाठविले असून यापैकी 112826 प्राप्त तर 579 अप्राप्त आहेत. तसेच 101166 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area