आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर उद्या वेबिनार

 


मुंबई,  दि.  ६ :  साथी संस्था पुणे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र आणि जन आरोग्य अभियान यांच्या वतीने महाराष्ट्रातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयावर व कोविडच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी व प्रत्यक्ष काम करणाऱ्या परिचारिका यांच्या संदर्भात सोमवारी दि. ०७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ .०० वा. वेबिनार आयोजित केला आहे.

 

या वेबिनारचे अध्यक्ष म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे व प्रमख पाहूणे म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हजर राहणार आहेत. या वेबिनारमध्ये कोविड कालावधीत प्रत्यक्ष काम करत असलेले आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांचे अनुभव, समस्या व उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास हेही सहभागी होणार आहेत.आरोग्यावर काम करणारी पुणे येथील साथी संस्था यांनी कोविड कालावधीत रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांना आलेल्या अनुभवावर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणचे अहवालावर चे सादरीकरण यावेळी होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area