राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आर. आर. पाटील फौंडेशन यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी महाशिबीर आयोजित

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आर. आर. पाटील फौंडेशन यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी महाशिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
येथील अशोका हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न शिबीराचा शुभारंभ इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन जांभळे, महिला अध्यक्षा सौ. रंजना बंडगर, आर. आर. पाटील फौंडेशनचे अध्यक्ष लखन बेनाडे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी श्री. शिखरे, डॉ. महाडीक, डॉ. सौ. जगवानी, डॉ. नंदकुमार पोखरकर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. या शिबीरात विविध बारा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरजूंना औषधोपचार करण्यात आले.
यावेळी इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन जांभळे यांनी, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूचनेनुसार देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगितले. या शिबीराचा परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेतल्याचे सांगितले. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.


याप्रसंगी इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर. आर. पाटील फौंडेशनचे सर्व पदाधिकारी, विविध सेलप्रमुख, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area