अनैतिक संबंधातून तरुणावर खूनी हल्ला

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

अनैतिक संबंधातून नागेश सुरेश यमुल याच्यावर खूनी हल्ला करणार्‍या राहुल विनोद पाथरवट, नागेश शिवाप्पा हिरीकुरभूर व सुप्रिया पांडु वाघमोरे या तिघांना गावभाग पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जखमी नागेश यमुल व सुप्रिया वाघमोरे यांच्यात प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच यमुल हा वाघमोरे हिच्या घरात ये-जा करीत होता. आसरानगर गल्ली नं.6 मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास यमुल हा वाघमोरे हिच्या घरातून बाहेर पडत असताना तेथे आलेल्या राहुल पाथरवट व नागेश हिरीकुरभूर यांनी त्याच्यावर खूनी हल्ला केला. त्यामध्ये यमुल गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत खोलीत कोंडून घालून पाथरवट, हिरीकुरभूर व वाघमोरे या तिघांनी पलायन केले होते. पोलिसांनी गतीने हालचाली करत तिघांनाही नजीकच्या कर्नाटक भागातून अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area