अवैद्य सावकारी कार्यवाही महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त - जिल्हा उपनिबंधक अमर शिंदेकोल्हापूर, दि. 18 :- शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 2, राधानगरी तालुक्यातील 1 व कोल्हापूर शहर येथील 1 गैर अर्जदारांच्या विरुध्द तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. उपनिबंधक पी. एल.जगताप यांच्या पथकाने गैर अर्जदार यांच्या राहत्या घरातुन खरेदीखत, कच्चानोंदी असलेल्या वह्या, भिषी/बचत नोंद वह्या व डायऱ्या, कोरे व लिखित चेक व हस्तलिखित बाँन्ड, संचकार पत्रे, दस्त व जमीनीशी संबंधित कागदपत्रे असे महत्वापूर्ण दस्ताऐवज जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.


जिल्ह्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे म्हणाले की, गैर अर्जदार रमेश आनंदराव कुंभार व रमेश तुकाराम पडियार, श्रीधर अर्जुंन गुरव, रा. जयसिंगपूर, रोहीत पाटील, हरोली, अनुप पाटील, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ, शिवगोंडा सिध्दगोंडा पाटील, दिपक बाळ खोत, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले, व उमेश हिंदूराव काशीद, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर व संजय श्रीपती भांदिगरे, रा पुंगाव, राधानगरी, जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुध्द अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल व पोलीस खात्यातील प्रशासन विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने दिनांक 18 डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात आली. यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पडताळणी करुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे आदेशान्वये झडती घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली.
सहकारी विभागाचे 9 अधिकारी व 42 कर्मचारी असे 51 कर्मचाऱ्यांची व 1 पोलीस अधिकारी व 18 पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झडती मध्ये प्राप्त झालेल्या अवैद्य सावकारी चे दस्त ऐवज, बाँन्ड, कोर चेक व इतर नोंदवड्या यांची चौकशीचे काम सुरु आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी अवैद्य सावकारीचे अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर अवैद्य सावकारीचे ओघात स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था च्यांच्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area