*अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे वितरण कार्यक्रम संपन्न*पुणे : :महिला व बाल विकास विभागाच्यावतीने अनाथ बालकासाठी अनाथ प्रमाणपत्र देण्याची योजना आहे. शासकीय व स्वयंसेवी बालगृहातील ज्या बालकांचे जैविक पालक नाहीत अशा सर्व बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अनाथ प्रमाण पत्र देण्यात येते.
दिनांक १४ नोव्हेंबर 2020 ते ३० नोव्हेंबर 2020 या कालावधीत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अनाथ प्रमाणपत्र पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत शासकीय व स्वयंसेवी बालगृहे, निरिक्षण गृहे येथील अनाथ बालकांना 'अनाथ प्रमाणपत्रे' देण्यात आली.
या पंधरवड्याचे औचित्य साधून विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विभागीय उप आयुक्त हिवराळे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद यांनी अनाथ
प्रमाणपत्राचा बालकांना होणारा उपयोग आणि भविष्यातील बालकांच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी .परम आनंद,
संरक्षण अधिकारी कविता थोरात
विधी तथा परीविक्षा अधिकारी
शीतल मोहिते, परीविक्षा अधिकरी किरण वाहुळे, समुपदेशक स्वाती नवले यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, आणि विभागीय उप आयुक्त कार्यालय ह्या कार्यालयाकडून बालगृहातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रमाणपत्राचा बालकांना त्यांच्या शैक्षणिक व उज्ज्वल भविष्यासाठी खूपच मदत होणार आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
. परम आंनद , जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पुणे
मोबा : 9152606883

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area