रामदास कोळी यांचा भारतीय जनता पार्टी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा इचलकरंजी/प्रतिनिधी -

भारतीय जनता पार्टी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रवक्ते रामदास कोळी आणि इचलकरंजी मंडल  भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष कोंडीबा दवडते यांनी सोमवारी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्याकडे सुपूर्द केला. पदाधिकारी असूनही काम करण्यास स्वातंत्र्य मिळत नसल्याने आणि वरिष्ठांकडून सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्यानेच आपण हा राजीनामा दिल्याचे कोळी आणि दवडते यांनी सांगितले.
रामदास कोळी यांनी, आजवर राजर्षि शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात वाढलो आणि वावरलो आहे. पक्षाचा प्रवक्ता असलो तरी मला काम करण्याचे कोणतेही स्वातंत्र त्याठिकाणी मिळाले नाही. त्यामुळे माझी घुसमट होत चालल्याने मी माझ्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. कोंडीबा दवडते यांनी, माझे काम पाहून मला भाजपाकडून इचलकरंजी मंडल भटके विमुक्त आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली. या माध्यमातून भटक्या विमुक्तांना एकत्र करुन त्यांना न्याय देण्यासह पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला. पण गत पाच वर्षात मला पक्षाकडून कामाबाबत काहीच स्वातंत्र्य मिळाले नाही. पक्ष सांगेल त्याप्रमाणे प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो. पण मला सापत्नतपणाची वागणूक मिळत गेली. त्यामुळे मी राजीनामा दिल्याचे सांगितले. या दोघांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने हे दोघे स्वगृही परतणार की अन्य पक्षाचा झेेंडा हाती घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area