मा. गो. वैद्य यांच्या निधनामुळे ज्ञानदीप मालवला : राज्यपाल भगत सिंह कोश्यारीमुंबई : दि. 20 :- महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विचारवंत व तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भिड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. श्री. वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा. गो. वैद्य यांनी  आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत‘चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालवला आहे. श्री. वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area