वीर जवान अमित पाटील यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

 


जळगाव  दि. 23 – कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित पाटील यांच्या कुटुंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन करुन शोक व्यक्त केला.

जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना वाकडी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पाटील यांना 16 डिसेंबर रोजी वीरगती प्राप्त झाली. आज पालकमंत्री ना. पाटील यांनी वीरजवान अमित पाटील यांच्या मूळ गावी वाकडी येथील घरी जाऊन त्यांचे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशालीताई पाटील, भाऊ, बहिण व मुलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

वीर जवान अमित पाटील यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, वीर जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.

यावेळी महेंद्र पाटील, रमेश पाटील, दिलीप घोरपडे, नानभाऊ कुमावत, भावडू गायकवाड, नकुल पाटील, मोती आप्पा पाटील, निलेश गायके, वसीम चेअरमन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area