इचलकरंजी/प्रतिनिधी -
येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने दिला जाणारा ’आदर्श माता’ व ’सखीसहेली’ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामध्ये सौ. हेमलता इरगोंडा पाटील यांना ’आदर्श माता’ आणि सौ. हर्षदा सुनिल मराठे यांना ‘सखीसहेली’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लबच्यावतीने स्व. सौ. मंजिरी प्रकाशराव सातपुते यांच्या स्मरणार्थ आदर्शमाता व सखीसहेली पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या पुरस्कारासाठी अनुक्रमे सौ. हेमलता पाटील व सौ. हर्षदा मराठे यांची निवड करण्यात आली होती. प्रमुख पाहुण्या सौ. गायकवाड यांनी, कर्तृत्ववान स्त्रिया केवळ कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला उर्जितावस्था प्राप्त करून देत असतात. त्यांचे कार्य जगासमोर आणणार्या प्रोबस क्लबचे हे कार्य विशेषत्वाने जाणवते, असे गौरवोद्गार काढले. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते होते. याप्रसंगी गौरवमुर्तीनी मनोगतातून मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
स्वागत सौ. मिरा जोशी यांनी केले. अध्यक्ष बाळासाहेब देवनाळ यांनी प्रास्ताविकात उपक्रमाचे महत्त्व विषद केले. सेक्रेटरी राजन मुठाणे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला. तर सौ. संगिता लडगे यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रोजेक्ट कमिटीच्या सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. रेखा लाटणे, मोहन कुलकर्णी, विजय पोवार, इरगोंडा पाटील, डि. एम. बिरादार, सुनिल मराठे, अजित कोईक, सुर्यकांत बिडकर, विजय बनसोडे, सर्जेराव घोरपडे, महावीर कुरूंदवाडे, काशिनाथ जगदाळे, अविनाश खोत, गजानन शिरगुरे, आप्पासाहेब कुडचे, शितल सातपुते, नरसिंह पारीक, राहुल सातपुते, सौ. ऐश्वर्या सातपुते, शिवबसु खोत, मनोहर कुराडे, हिमांशु मिरगे, पद्माकर तेलसिंगे, हजरत पिरजादे, विजय हावळ, प्रकाश अनुरे, शकुंतला जाधव, सुजाता कोईक, वसुंधरा कुडचे, महादेवी खोत, मंजुश्री देवनाळ, सुनिता कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. प्रमोदिनी देशमाने यांनी केले.