ऑटोलूम कारखान्यात दहा ते बाराजणांच्या टोळक्याने घुसून हल्ला

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

जुना चंदुर रोड परिसरातील एका ऑटोलूम कारखान्यात दहा ते बाराजणांच्या टोळक्याने घुसून हल्ला केला. या टोळक्याने कारखान्यातील कामगारांनाही मारहाण करण्यात आली. तसेच विविध साहित्यासह नासधूसही केल्याने सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद महावीर मनोहर भोजे (वय 43, रा. काडापुरे तळे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी दहा ते बाराजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याचे कारण समजु शकलेले नसून या घटनेमुळे भागातील उद्योजकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, काडापुरे तळे परिसरात राहणारे मनोहर भोजे यांचा जुना चंदूर रोड परिसरात ऑटोलूम कारखाना आहे. दुर्गा फॅबटेक्स व पारस फॅबटेक्स या फर्मच् माध्यमातून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 10 ते 12 जणांच्या टोळक्याने त्यांच्या कारखान्यात प्रवेश करत गोंधळ घातला. यावेळी कारखान्यातील विशाल चौगुले याच्यासह अन्य कामगारांना येथे परत कामावर आल्यास तुम्हाला पुन्हा येऊन मारणार अशी धमकी देत मारहाण केली. त्याचबरोबर या टोळक्याने भोजे यांच्या कारखान्यातील एअरजेट लुमचे 12 यंत्राचे डिस्प्ले, ऑपरेटर पॅनल यांची नासधूस केली. तसेच चालु यंत्रमागावरील दोन बिमेही कापली. आणि पार्टीशनच्या भिंतीच्या काचा फोडत दहशत माजवली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोरांनी पलायन केले होते. हल्ल्यात यंत्रमागाचे व कारखान्याचे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद भोजे यांनी दिली आहे. कामगार किंवा वहिफणी कामाच्या कंत्राटावरून हा हल्ला झाला अशी पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. भोजे यांनी दीड महिन्यापूर्वी कारखाना सुरू केला आहे. भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीस उपाधिक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव आदींनी भेट देऊना पाहणी करत तपासाबाबत सुचना केल्या. अधिक तपास पोऊनि प्रमोद मगर करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area