राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली – मंत्री अस्लम शेख

 


मुंबई, दि.8 : राज्यातील जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले.

 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत निवेदन दिले.

 

श्री.अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रीडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.

 

श्री.शेख  म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area