डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावेसातारा दि. 23 : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालय यांनी डिसेंबर 2020
अखेरचे ई आर-1 तिमाही विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या संकेतस्थ्ळावर ऑनलाईन पध्दतीने
सादर करावे,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले.
ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area