* 50 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 750 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*


सातारा दि. 23 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 50 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 750 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

* 750 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 32,कराड येथील 106,फलटण येथील 10,कोरेगाव येथील 23,वाई येथील 112,खंडाळा येथील 3, रायगांव येथील 80,पानमळेवाडी येथील 216, महाबळेश्वर येथील 20, दहिवडी येथील 73,म्हसवड येथील 43,व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 32 असे एकूण 750 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -306915*
*एकूण बाधित -55879*
*घरी सोडण्यात आलेले -53360*
*मृत्यू -1809*
*उपचारार्थ रुग्ण-710*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area