मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


मुंबई, दि. 27 : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जुने कस्टम हाऊस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अरुण अभंग, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत आदी उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री जनारोग्य योजना, महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या टाटा मेमोरियल, ग्रँट मेडिकल कॉलेज अँड जे जे हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, के.ई. एम. हॉस्पिटल, एल.टी. एम.जी. कॉलेज अँड हॉस्पिटल, के.जे. सोमय्या हॉस्पिटल, कामा अँड आल्बलेस हॉस्पिटल, मुस्लिम अँबुलन्स डायलिसिस सेंटर, लालबाग राजा डायलिसिस सेंटर या रुग्णालयाचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच नशामुक्ती व बेटी बचाओ, बेटी पढाओ शपथ विषयी शपथ घेण्यात आली.

शौर्य पदक विजेते स्कॉड्रन लिडर परवेज जामजी यांच्या पत्नी श्रीमती जरीन जामजी यांचा सत्कार करण्यात आला. महाज्योती संस्थेच्या वतीने आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील निबंध स्पर्धेतील विजेते नम्रता अर्जुन शुक्ला, रुणाली दवणे, निनाद मुरूडकर यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणाले की, नागरिकांनी कोणतेही काम करताना भारतीयत्व या संकल्पनेला तडा जाऊ देऊ नये. राज्य शासन रुग्णसेवा, नशामुक्त भारत, बेटी बचाव असे अनेक उपक्रम राबवित असते, नागरिकांनीही लोकशाही मूल्ये जपत या उपक्रमात सहभागी व्हावे.

तहसीलदार अश्विनी कुमार पोतदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area