छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रजासत्ताक दिन समारंभाची रंगीत तालीम संपन्न

 


मुंबई, दि. 24 : प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची आज रंगीत तालीम करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम मर्यादित स्वरुपात होणार आहे. आजच्या रंगीत तालमीमध्ये सलामीसाठी झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्र पोलीस ब्रास बॅण्ड, राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल आणि बृहन्मुंबई अश्वदल या मर्यादित दलांनी सहभाग घेतला. मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगविषयक नियमांचे यावेळी पालन करण्यात आले.

राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, राजशिष्टाचार विभागाचे  उपसचिव तथा उपमुख्य राजशिष्टाचार अधिकारी उमेश मदन, अवर सचिव राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area