‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन

 


मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद अनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार श्री. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 27 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कोविड-19 निर्बंधांचे पालन करत मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

या समारंभास उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांच्यासह सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ आणि नगर विकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते श्री. प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार श्री. अरविंद सावंत, आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून http://www.parthlive.com या साईटवर क्लिक करुन मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकावर हा कार्यक्रम पाहता येईल. याशिवाय https://twitter.com/CMOMaharashtra,

https://facebook.com/CMOMaharashtra,

http://www.twitter.com/MahaDGIPR

http://www.facebook.com/MahaDGIPR

http://www.youtube.com/maharashtradgipr

https://youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी सीमाकक्षाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.दीपक पवार यांच्याशी 9820437665 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area