विधान भवनात हुतात्म्यांना अभिवादन

 


मुंबईदि. 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना विधिमंडळात पीठासीन अधिकारी तसेच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आज विधानभवन येथे अभिवादन करून आदरांजली वाहिली. त्याचबरोबर हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विधानमंडळाचे उप सचिव राजेश तारवी यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचे सचिव महेंद्र काज, विधानसभा अध्यक्षांचे सचिव शांतीलाल भोई, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने व विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area