अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

 



मुंबई दि. 28 : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

 

मंत्रालयात अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत श्री.मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, विभागाचे अधिकारी व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणारी 2388 अनुदानित वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलींसाठी 578 व मुलांसाठी 1810 अनुदानित वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांची एकूण मान्य विद्यार्थी संख्या 99 हजार 552 इतकी आहे.

 

या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत व अन्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या बाबतीत वित्त विभागाशी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area