लेखक शंकर सारडा यांच्या निधनाने दर्जेदार साहित्यिक आणि समीक्षक गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 



मुंबईदि. 29 – प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा  यांच्या निधनाने राज्याने एक दर्जेदार साहित्यिक आणि समीक्षक गमावला आहेया शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शंकर सारडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

पत्रकारसमीक्षक आणि बालसाहित्यकार अशी ओळख असलेल्या श्री. शंकर सारडा यांनी  आनंदबालमित्रसाधनामुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून लिखाण केले. अनेक नामांकित आणि दर्जेदार वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांना मोठा अनुभव होता.

६०हून अधिक पुस्तके आणि दोन हजांराहून जास्त पुस्तकांचे समीक्षण करणाऱ्या सारडा यांनी प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद केला. शंकर सारडा यांच्या निधनाने राज्याने एक दर्जेदार लेखकसाहित्यिक आणि समीक्षक गमावला आहेअसे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area