जिल्ह्यात एकाच दिवसात विनामास्क फिरणाऱ्या 397 जणांवर दंडात्मक कारवाई
 सिंधुदुर्ग ,दि.- 23:  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात 397 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

 यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 41 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 8 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे तर पोलिसांनी 176 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 35 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक 180 व्यक्ती या विनामास्क आढळून आल्याअसून त्यांच्याकडून एकूण 36 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 79 हजार 400 रुपये इतकी आहे. 

 त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 126 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 14 ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये 4 रेस्टॉरंटचाही समावेश आहे. 

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅन्डसॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area