चेन स्नॅचिंग करण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केले

 


शहरातील विविध भागातून चेन (Chain) स्नॅचिंग करण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 2 लाख 15 हजारांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सलमान युसूफ अली (वय 24, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, मूळ-मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 15 दिवसांपुर्वी दुचाकी चोरणारा नातूबाग मैदान परिसरात थांबल्याची माहिती अमेय रसाळ आणि राहूल मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सलमानला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांच्या हाताला झटका मारून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शहरात चेनस्नॅचिंग करण्यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. 

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, अजिज बेग, फहिम सय्यद, गणेश सातपुते, संदीप पाटील, अमेय रसाळ, सागर केकाण, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहूल मोरे, रवी लोखंडे, विशाल जाधव यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area